माननीय मुख्यमंत्री
माननीय उपमुख्यमंत्री
तथा माननीय गृहनिर्माण मंत्री
माननीय उपमुख्यमंत्री
पुणे शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून आणि पिंपरी-चिंचवड हे शहर उद्योग नगरी म्हणून ओळखले जाते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरामध्ये उद्योग, व्यवसाय, शिक्षण तसेच रोजगार यासाठी देशाच्या अन्य भागातून मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतरित होतात. शहरात नव्याने येणाऱ्या लोकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता निवाऱ्याची सोय उपलब्ध होत नसल्याने त्यांनी प्रदीर्घ काळापासून झोपडपट्टीमध्ये वास्तव्य केले आहे. पुणे शहरामध्ये 486 झोपडपट्ट्या असून त्यामध्ये जवळपास 1,65,000 एवढ्या कुटुंबाचे वास्तव्य असून शहराच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 28 टक्के लोक झोपडपट्टीत राहत आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात 71 झोपडपट्ट्या असून त्यामध्ये सुमारे 35,261 कुटुंबाचे वास्तव्य आहे. शहराच्या उकूण लोकसंख्येच्या सुमारे 14.78 टक्के लोक झोपडपट्टीत राहत आहेत.झोपडपट्टीतील अस्वच्छ व अनारोग्य असलेल्या परिस्थितीत तेथील लोक खडतर अवस्थेत जीवन कंठीत असतात. झोपडपट्टीत राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पात्र कुटुंबाना त्यांच्या स्वप्नातील पक्के घर राज्य शासनाने प्राधिकरणाच्या मध्यामातुने विनामुल्य देऊ केले आहे. शासनाने झोपडपट्टीने व्यापलेल्या जमिनीचा साधनसंपत्ती म्हणून सुयोग्य वापर करून प्रोत्साहनात्मक चटईक्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय करून झोपडपट्टी पुनर्वसन योजना अंमलात आणली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत पात्र झोपडपट्टीवासियांना आवश्यक सोयी सुविधायुक्त घर विनामुल्य मालकी हक्काने उपलब्ध करून झोपडपट्टीवासी यांचे राहणीमान व जीवनमान उंचावण्याचे राज्य शासनाचे ध्येय आहे. त्यानुसार योजनेचा लाभ घेवून पुणे व पिंपरी-चिंचवड ही शहरे झोपडपट्टी मुक्त करणे हा प्राधिकरणाचा ध्यास आहे “अल्पायुषी प्राधिकरण आणि पुनर्विकास चिरंतर” झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे ध्येय आहे.
© ही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण-पुणे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क राखीव.