उत्तर – अशा प्रसंगी पात्रता सिद्ध करण्यासाठी सदर झोपडीधारकाची झोपडी व त्यामधील त्याचे वास्तव्य हे दि01/01/2000 रोजी किंवा त्यापूर्वीपासून असल्याचे शासकीय/ निमशासकीय संस्थांनी दिलेल्या दस्तऐवजाच्या आधारे सिद्ध करणे गरजेचे आहे. उदा. शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा परवाना (मुंबई दुकाने व संस्था अधिनियम 1948 अन्वये दिलेला परवाना, खानावळ/उपहार गृह परवाना, औद्योगिक परवाना, गुमास्ता परवाना इत्यादी.) सादर केला पाहिजे. झोपडीधारकाच्या नावाने व झोपडी असलेल्या पत्त्यावर दि 1 जानेवारी 2000 पूर्वीचे वीज बिल, दूरध्वनी देयक किंवा कर, व्यवसाय कर, आयकर इत्यादी करांचा भरणा केल्याचा पुरावा असला पाहिजे. वरीलपैकी कोणताही पुरावा सादर केल्यास झोपडीधारक योजनेत लाभ मिळण्यास पात्र होईल.